फटाक्यांच्या गोदामात स्फोट, 3 ठार

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात फटाक्यांच्या गोदामात झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. तसेच सहा जण जखमी झाले. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा प्रतिध्वनी 5 किमी दूरपर्यंत ऐकू आला.

मृतांचे मृतदेह इकडे तिकडे विखुरलेले होते. स्फोटाची तीव्रता आणि गोदामाचे झालेले नुकसान पाहता येथे फक्त फटाके बनवले जात होते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण स्फोट हा ग्रेनेड (बॉम्ब) फुटल्यासारखा होता. बेलतंगडी येथील कुक्कडी येथे हा अपघात झाला.