फळे खायला आवडत नाही? मग ट्राय करा फ्रुट चाट

तरुण भारत लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२३। फळे आपल्या आरोग्यासाठी  चांगले असतात. फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असत. पण मोजक्याच लोकांना फळे खायला आवडत. तर काही लोकांना आवडत नाही. ज्यांना फळं खायला आवडत नाही ते फ्रुट चाट ट्राय करू शकता. तर फ्रुट चाट घरी कसं बनवतात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
सफरचंद, संत्रे, डाळिंबाचे दाणे,  उकडलेले बटाटे , सोलून आणि चौकोनी तुकडे, केळी, दही,  लाल मिरची पूड,  जिऱ्याची पूड, काळी मिरी पूड,  चाट मसाला,  साखर, लिंबाचा रस, मीठ.

कृती 
सर्वप्रथम,
सगळ्या फळांना स्वच्छ धुऊन, चौकोनी फोडी करून घ्याव्यात . तुम्ही वरील फळांऐवजी इतर फळेही वापरू शकता , जसे पेरू, पपई किंवा अननस .दह्याच्या मिश्रणासाठी दही, लिंबाचा रस , लाल मिरची पूड , जिरे पावडर, चाट मसाला , काळी मिरे पावडर, चवीनुसार मीठ, आणि साखर घालून नीट फेटून घ्यावे. 

आपल्या चवीप्रमाणे मसाले कमी जास्त प्रमाणात वापरावेत. दह्याचे मिश्रण तयार आहे.आता फळांचे तुकडे एका बाऊलमध्ये घेऊन ते वरखाली एकत्र करून घ्यावेत. या फळांवर दह्याचे मिश्रण घालून नीट हलक्या हाताने मिसळून घ्यावे . चटपटीत फ्रुट चाट तयार !