फी न भरल्याने विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश नाकारला

तरुण भारत लाइव्ह न्युज | जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये गुरुवारी 15 रोजी शाळाप्रवेशानिमित्त विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र दुसरीकडे खाजगी माध्यमाच्जा विद्या इंग्लिश स्कूलमध्ये फीचा तगादा लावत विद्यार्थ्यास पहिल्याच दिवशी शाळा प्रवेश नाकारला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रारी केली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत झाले. मात्र शहरातील खासगी विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना थकीत फी जमा न केल्याचे कारण देत शाळेत बसू दिले नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांचे पालक दीपक मांडोळे यांनी केली आहे. 31 मे रोजी विद्यार्थ्यांचे पालक पुढील सर्व फी पूर्ण भरणार असल्याचे पत्राव्दारे कळविले आहे. कोणत्याही विद्यार्थ्यास फीसाठी अशाप्रकारे वागणूक देऊ नये, असेही त्यांनी शाळेच्या पर्यवेक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांंनी गुरुवारी जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

शाळेकडून नो प्रतिसाद...

शाळेत पहिल्याच दिवशी प्रवेश नाकारल्यासंदर्भात शहरातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचे पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनीही यासंदर्भात प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संबंधित शाळा व्यवस्थापनाची भूमिका कळली नाही. विद्यार्थ्यांस शाळेत प्रवेश नाकारल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

  • डॉ. नितीन बच्छाव, माध्यमिक, शिक्षणाधिकारी, जि.प. जळगाव