फैजपूर, जळगाव : फैजपूर येथील पालिकेच्या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत ही पावसाळ्यात गळत असून, शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याने पालकवर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळेच्या इमारतीची अवस्था पाहून जनार्दन महाराज यांचे डोळे अक्षरशः पानावलेत. शाळेची अशी अवस्था असताना देखील संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
फैजपूर येथील पालिकेच्या शाळेची दयनीय अवस्था झाली असून, शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. शाळेची इमारत ही पावसाळ्यात गळत असून, यामुळे शाळेतील महागड्या शैक्षणिक वस्तूचे नुकसान होत आहे. शिवाय, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. दरम्यान, जनार्दन महाराज यांनी आज शुक्रवारी शाळेला भेट दिली. यावेळी शाळेच्या इमारतीची अवस्था पाहून श्री महाराज यांचे डोळे अक्षरशः पानावले.
तात्काळ संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये, असे जनार्दन महाराज यांनी सांगितले. विध्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्यसह जीवितीला धोका, जीवित हानी झाल्यास जवाबदार कोण ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच सामाजिक जबादारी समजून सर्वांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन श्री महाराज यांनी केले.
पालकांमध्ये तीव्र संताप
शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याने पालकवर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष दिल्यास पालक आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने येथे उद्रेक व्हायच्या आधी काय करता येईल ते करावं, असंही श्री महाराज म्हणाले.