धुळे : तरुणीचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना शिरपूर येथे घडली. याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपुरातील एका १८ वर्षीय तरुणीला संशयिताने फोन करून भेटण्यास बोलाविले. मोबाइलमध्ये काढलेले फोटो तिला दाखविण्यात आले. सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली.
पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून १० रोजी संशयित आरोपी जयेश नरेंद्र महाले (वय १९, रा. होळनांथे, ता. शिरपूर) याने फोन करून एकट्यास भेटण्यासा शिरपुरातील बसस्थानकाजवळ बोलाविले.
पीडितेचे आरोपीसोबतच्चे मोबाइलमध्ये असलेले फोटो डिलीट करीन, असे सांगून चॉकलेट खाण्यास दिले. नंतर अत्याचार केला. तसेच व्हिडीओ शूटिंग करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी संशयित आरोपी जयेश महाले याच्याविरुद्ध शिरपूर शहर पोलिसात लैंगिक अत्याचारान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.