तरुण भारत लाईव्ह । २४ सप्टेंबर २०२३। सध्या गणेश उत्सव सुरु आहे. यानंतर लगेच १५ दिवसांनी नवरात्र असेल मग दसरा, दिवाळी यासारख्या सणांमध्ये खरेदीची रेलचेल असते. नवीन कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा काही गोष्टी आपण खरेदी करत असतो. सणासुदीच्या निम्मिताने कित्येक ई-कॉमर्स वेबसाईट मोठ्या सेलची घोषणा करत असतात. फ्लिपकार्टचा आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट सेल येणार आहे.
या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ५० ते ८० टक्क्यांची सूट मिळणार आहे. यामध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, अॅक्सेसरीज, टीव्ही, किचन अप्लायन्सेस, वॉशिंग मशीन अशा गोष्टींचा समावेश असेल. सोबतच कपडे, शूज, दागिने आणि इतर गोष्टींवर देखील मोठा डिस्काउंट मिळत आहे. फॅशन कॅटेगरीमध्ये ६० ते ९०% सूट दिली जाणार आहे. तर, फ्लिपकार्ट ओरिजिनल्सवर देखील ६० टक्के सूट दिली जाणार आहे.
तसेच येणाऱ्या फ्लिपकार्ट सेल ब्युटी, स्पोर्ट्स आणि इतर गोष्टींवर ६० ते ८० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. तर, होम डेकॉर आणि फर्निचर कॅटेगरीमध्ये ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा सेल असेल. ‘फ्लिपकार्ट प्लस’ मेंबरशिप असणाऱ्या ग्राहकांसाठी कदाचित हा सेल एक दिवस आधी सुरू होऊ शकतो.