सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये अनेक पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. तुम्हालाही बँकेत नोकरी मिळण्यास इच्छुक आणि पात्र असल्यास, तुम्ही अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकता.
या भरतीद्वारे एकूण 627 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. तुम्हालाही बँकिंग क्षेत्रात चांगले करिअर करायचे असेल, तर तुम्ही 2 जुलै 2024 किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता.
या पदांवर भरती होणार
बँक ऑफ बडोदाने विविध पदांसाठी एकूण 627 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत नियमितपणे 168 पदे तर कंत्राटी पद्धतीने 459 पदे रिक्त आहेत.
भरतीसाठी पात्रता काय असेल?
(i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणारा कोणताही उमेदवार, त्याचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा वेगळी आहे.
इतकी अर्जाची फी भरावी लागेल
सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु 600 + कर
SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी अर्ज फी – रु 100/- + कर