तरुण भारत लाईव्ह । १२ ऑक्टोबर २०२३। गणेशोत्सव झाला आता सर्वत्र नवरात्राची जोरदार तयारी सुरु झाली आहे. नवरात्रीनंतर काही दिवसानंतर दिवाळीचा सण सुरु होईल. सणासुदीचा काळ सुरु असून बरेच जण कपडे, दागिने, इलेकट्रोनिक वस्तू खरेदी करतात पण तुम्हाला जर इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे ती म्हणजे देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी निर्मात्यांपैकी एक असलेल्या komaki ने त्याच्या signature मॉडेल LY वर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी कि कंपनी सणासुदीच्या सवलती अंतर्गत २१ हजार रुपयांची संपूर्ण सूट देत आहे. म्हणजे komaki LY खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,३४,९९९ रुपयांऐवजी फक्त १,१३,९९९ रुपये खर्च करावे लागतील. komaki LY इलेक्ट्रिक विभागाचे संचालक गुंजन मल्होत्रा म्हणाले की, ‘सणासुदीचा काळ आला आहे, त्यामुळे प्रत्येक घर आनंदाने भरले जावे अशी आमची इच्छा आहे. ग्राहकांना त्यांची आवडती स्कूटर इतक्या कमी रकमेत आणून, त्यांनी सणांचे स्वागत करावे अशी आमची इच्छा आहे.
या स्कूटरचे वैशिट्य असे आहे कि LY मध्ये 62V32A ड्युअल बॅटरी आहे,जी काढता येईल अशी आहे आणि 5 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होऊ शकते. komaki LY मध्ये TFT स्क्रीन ऑनबोर्ड नेव्हिगेशन, साउंड सिस्टम, ब्लूटूथ, कॉलिंग पर्याय आणि इतर रेडी-टू-राईड वैशिष्ट्ये आहेत. LY मध्ये तीन गियर मोड आहेत – इको, स्पोर्ट्स आणि टर्बो. LED फ्रंट विंकर्स, 3000-वॅट हब मोटर/38 amp कंट्रोलर, पार्किंग असिस्ट/क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट आणि इतर वैशिष्ट्यांमुळे ही स्कूटर मार्केटमध्ये एक अनोखी आणि अनोखी स्कूटर आहे.