अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर बच्चू कडू यांच्या पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी 24 एप्रिलला सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी प्रहार पक्षाला 23 आणि 24 एप्रिल तारखेची परवानगी मिळाली होती. तर खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी 21 आणि 22 तारीख देण्यात आली होती. पण त्यांची सभा झाली नाही. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 24 एप्रिलला सभा आयोजित करण्यात आली आहे. पण प्रशासनाकडून बच्चू कडू यांच्या पक्षाला 23 आणि 24 एप्रिल तारखेला सायन्स कोर मैदानावर सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे बच्चू कडू आज सायन्स कोर मैदानावर दाखल झाले. पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यानंतर बच्चू कडू यांनी मैदानावरच ठिय्या मांडला. बच्चू कडू यांना समजवण्याचा पोलिसांनी प्रचंड प्रयत्नही केले. पण बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या या भूमिकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारची कुठलीही भूमिका घेऊ नये, ज्यामुळे राज्याचं नाव खराब होईल”, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं.