बनारसी स्टाईल बटाट्याची भाजी रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ११ ऑक्टोबर २०२३। बटाट्याची भाजी हि बहुतेक लोकांना आवडते. उकडलेले बटाट्याची भाजी असेल किंवा मग साध्या बटाट्याची भाजी असेल हि जवळपास सगळ्यानाच आवडते. पण नेहमी त्याच प्रकारची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही बनारसी स्टाईल बटाट्याची भाजी बनवू शकता. बनारसी स्टाईल बटाट्याची भाजी कशी  बनवायची हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
बटाटे, धने, जिरे, तेल, तिखट, मीठ, आमचूर पावडर.

कृती
सर्वप्रथम, एका कढईत जिरे गोल्डन-ब्राऊन रंगाचे होईपर्यंत चांगले भाजून घ्या जिरे आणी धने गोल्डन-ब्राऊन रंगाचे होईपर्यंत चांगले भाजून घ्यावे. यांनतर भाजलेल्या धने आणि जिऱ्याची पूड करावी. नंतर बटाटे शिजवायला ठेवा. ४ ते ५ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून घ्या. यानंतर एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात जिरे, बारीक चिरलेले बटाटे, कुटलेल्या धण्या-जि-याची पावडर, लाल तिखट पावडर, मीठ आणि आमचूर पावडर घाला आणि सर्व सामग्री परतून घ्या. तयार आहे बनारसी स्टाईल बटाट्याची भाजी.