बळीराजा संकटात! ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचं अतोनात नुकसान

मुंबई : राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. परिणामी सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक पाण्याखाली गेली असून, बळीराज संकटात आला आहे. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही ढगफुटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अमरावती जिल्ह्यात देखील गुरुवारी दुपारी काही गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शिराळा, पुसदा, नांदुरा शेत शिवारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतीत पेरलेल्या सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही ढगफुटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.