बहिणाबाईंची ‘पणती’ माऊंट एव्हरेस्टच्या समोर करणार ऐतिहासिक स्कायडायव्हिंग

डॉ. पंकज पाटील
जळगाव :
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती व मूळची जळगावची रहिवासी असलेली पद्मश्री शितल महाजन माऊंट एव्हरेस्टसमोर ऐतिहासीक स्कायडायव्हिंग करणार आहे. हा विक्रम ती 7 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत करणार आहे.

भारताची एक अनुभवी स्कायडायव्हर असलेल्या शितलने 2004 मध्ये उत्तर ध्रुवावर आणि 2006 मध्ये दक्षिण ध्रुवावर, 2018 मध्ये सर्व 7 खंडांवर स्कायडायव्हिंग केले आहे. आता ती रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने “ माउंट एव्हरेस्टच्या समोर स्कायडायव्हिंग” ही नवीन आणि धाडसी मोहिम पूर्ण करणार आहे.

7 ते 15 नोव्हेंबरला घेणार उडी

7 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत माऊंट एवरेस्ट समोर ऐतिहासीक स्कायडायव्हिंग करण्याचे  नियोजन केले आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार  ती हेलीकॉफ्टरमधुन उडी घेणार आहे.  एव्हरेस्ट स्कायडाइव्हसाठी विशेष पॅराशूट उपकरणे आवश्यक आहेत, या सर्वांची चाचणी गेल्या आठवड्यात अमेरिकेत करण्यात  आली आहे.

सर्व साहसांना मागे टाकणारे साहस

एव्हरेस्टच्या अगदी खाली 23,000 फूट उंचीवरून माउंट एव्हरेस्टच्या समोर हेलिकॉप्टरवरून उडी मारणार आहे. यावेळी पॅराशूटची सुरुवातीची उंची 16,000 फूट आणि 18,000 फूटाच्या दरम्यान असेल. हिमालयातील स्वप्नभूमी  आणि  तसेच कालापत्थर येथे सर्वोच्च पॅराशूट लँडिंग आणि अधिक उंच ठिकाणी उतरणे हे निर्विवादपणे जगातील सर्वात रोमांचकारी हवाई साहस आहे. या उंचीवर 260 – 400 चौरस फूट मोठे मुख्य पॅराशूट आणि समान आकाराचे राखीव पॅराशूट आवश्यक आहेत.

असे होतील जागतीक विक्रम

शीतलच्या या साहसी उडीने अनेक जागीतक विक्रम होणार आहेत. यात एका भारतीय महिलेचे सर्वात उंच पॅराशूट लँडिंग करणे, जगातील तीन ध्रुवांवर स्कायडायव्ह करणारी जगातील पहिली भारतीय महिला, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि जगातील तिसरा ध्रुव म्हणजेच माउंट एव्हरेस्ट समोर स्कायडाइव्ह करणारी पहिली भारतीय नागरी महिला, ध्वजासह सर्वात उंच पॅराशूट लँडिंग यासारख्या विक्रमांची नोंद राष्ट्रीय स्तरावर होणार आहे.

जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या समोर 23,000 फुटांवरून आकाशात उच्च उंचीवर उड्डाण करणे आणि जमिनीवरून हिमालयातील जगातील सर्वोच्च पर्वतशिखरांवर आयुष्यात एकदाचा थरारक हवाई साहसी अनुभव हा एक अविश्वसनीय अनुभव असेल.  यासोबतच आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुक्स आणि साहसी लोकांच्या इतिहासात त्याची नोंद होईल.

 भारतीय महिलांच्या प्रतिमेचे प्रतिनिधीत्व

ही मोहीम केवळ वैयक्तिक प्रयत्न नसून जागतिक स्तरावर भारतीय महिलांच्या प्रतिमेचे प्रतिनिधित्व करणारी आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताचे दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‌‘बेटी की उडान, देश का स्वाभिमान’ (मुलीचे उड्डाण हे राष्ट्राचा अभिमान आहे) या घोषणेपासून मला प्रेरणा घेतली आहे.  माऊंट एवरेस्टसमोर  स्कायडायव्हिंग करण्याचे स्वप्न 2007 पासून जोपासले आहे आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने मी आता ते प्रत्यक्षात आणण्यास तयार आहे.

 – शीतल महाजन