उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची रामगंगा नगर कॉलनीत धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
तिच्या मैत्रिणीच्या माहितीवरून पोलीस आले आणि त्यांनी भाड्याच्या खोलीतून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पिंकी सागर असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे वय 30 वर्षे होते. मृत पिंकीच्या आईने आपल्या मुलीच्या प्रियकराविरुद्ध खुनाची तक्रार दाखल केली आहे.
बरेली पोलीस आरोपी प्रियकराचा शोध घेत आहेत. तसेच या संपूर्ण खून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, हरुंगला येथे राहणारी पिंकी सागर हिचा तिचा पहिला पती मदनपाल याच्यासोबत 8 वर्षांपूर्वी वाद झाला होता. तेव्हापासून ती पतीपासून वेगळी राहत होती.
ती काही दिवसांपासून रामगंगा नगर कॉलनीत प्रियकर जोगेंद्रसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. येथे दोघेही सेक्टर 7 मध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होते.
पिंकीची ९ वर्षांची मुलगी मुस्कानही त्यांच्यासोबत राहत होती. घटनेच्या वेळी पिंकीची मुलगी मुस्कान ही तिच्या आजी सावित्रीदेवी यांच्या हरुंगला येथील घरी गेली होती.