---Advertisement---

बाजरीच्या शेतात ओढले, महिलेवर बळजबरीने अत्याचार; गुन्हा दाखल

---Advertisement---

तळोदा : रोझवा पुनर्वसन येथे बाजरीच्या शेतात एका ३४ वर्षिय महिलेवर नराधमाने बळजबरीने अत्याचार केला. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांत एकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोझवा पुनर्वसन येथे 28 रोजी संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास पीडित महिला ही  तिच्या मूलीसह दिराच्या घरी जात होती.  रस्त्यात मालसिंग दाना पावरा यांचे शेताजवळ जात असताना लेह-या शंकर पावरा हा फिर्यादीच्या मागून आला.  फिर्यादीचे तोंड दाबुन फिर्यादीस ओढत मालसिंग दामा पावरा यांच्या बाजरीच्या शेतात बळजबरीने अत्याचार केला.

या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून लेह-या शंकर पावरा रा. रोझवा पुनर्वसन याचा विरोधात तळोदा पोलिस स्टेशनला फौजदारी भा.द.वि.कलम 376, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वगैरे मजकुरच्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांचे मार्गदर्शना खाली पोसई धर्मेंद्र पवार करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment