बापरे! डिसेंबरपर्यंत सोने गाठणार ८० हजारांचा टप्पा, जळगावात आज काय आहेत भाव?

जळगाव । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सुवर्णबाजारात चांदीचा दर २९०० रुपयांनी तर सोने २०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र डिसेंबर महिन्यांपर्यंत सोन्याचे दर ८० हजार रुपयापर्यंत जाणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.

यामुळे आताच स्वस्तात सोने खरेदी संधी आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या घसरणीनंतर आता जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ७१ हजार ३०० रुपयावर आला आहे. सोबतच चांदीचा विनाजीएसटी ८९ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे.

डिसेंबरपर्यंत सोने गाठणार ८० हजारांचा टप्पा

इराण-इस्त्राईल युद्धजन्य परिस्थितीनंतर सोन्यात तेजी आली. मात्र, वातावरण थंडावल्यानंतर दरात स्थिरता आली आहे. मात्र, असे असले तरी जुलैपासून सोन्याचे दर पुन्हा वाढून डिसेंबर महिन्यांपर्यंत सोन्याचे दर ८० हजार रुपये तोळ्यावर जाण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.