बापरे! महेंद्रसिंग धोनीला मित्रानेच लावला तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा चुना ; नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली । टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. धोनीची जवळच्या मित्राने 15 कोटी रुपयांची फसवणूक केली. मित्राने दगाफटका केल्याने त्याच्यावर कोर्टात धाव घेण्याची वेळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या मिहिर दिवाकर आणि सौम्या बिस्वास यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून त्यांच्याविरोधातधोनीने रांची कोर्टात याचिका दाखल केली.

काय आहे हा संपूर्ण वाद?
महेंद्रसिंग धोनी एक क्रिकेटर असण्यासोबतच एक यशस्वी बिझनेसमन देखील आहे. त्यांनी अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. धोनी आणि मिहिर दिवाकर यांच्यात क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी करार झाला होता आणि हा करार आजचा नाही तर २०१७ मध्ये झाला होता. पण दिवाकरने या कराराचं उल्लंघन केल्याचं धोनीच्या लक्षात आलं. अरका स्पोर्ट्सला फ्रेंचायसीचं शुल्क आणि करारानुसार प्रॉफिटही शेअर करायचं होतं. पण ठरल्यानुसार काहीच घडलं नाही. विश्वासघात झाल्याचं महेंद्रसिंह धोनीला बऱ्याच वर्षांनी लक्षात आलं.

रिपोर्ट्सनुसार,धोनीने याप्रकरणी अनेक कायदेशीर नोटीसा देखील पाठवल्या. पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. मात्र कसलीच दाद मिळत नसल्याने अखेर कोर्टात धाव घ्यावी लागली. मित्राकडून फसवणूक झाल्याने धोनीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.