बाप्पाची मूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोने ४ जणांना उडवलं; धुळ्यातील घटना

तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणपती विसर्जन मिरवणूक बघायला जात असलेल्या चार भाविकांना टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत एका चिमुकलीसह तिघे गंभीर जखमी झाली आहे. चिमुकलीच्या पायावरून टेंपो गेल्यानी ति गंभीर जखमी झाली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जुना आग्रा रोड मार्गाने दरवर्षी गणपती मंडळांकडून बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघते. विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी हे चारही भाविक गेले होते. दरम्यान यावेळी गणेश विसर्जनासाठी घेऊन जात असलेल्या एका टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पोने रस्त्यावरून जाणाऱ्या या चारही भाविकांना धडक दिली.  या अपघातात हे चारही भाविक गंभीर जखमी झालेत.

अपघातानंतर या तिघांनाही उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  यामध्ये चिमुकलीचा पाय फ्रॅक्चर झाला असून, तिची आई गंभीर जखमी झाली तसेच एका मुलाच्या पोटावरून टेंपो गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.  हि घटना घडल्यानंतर टेम्पो चालकाने घटना स्थळाहून पळ काढण्याची माहिती समोर येत आहे.