बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनटात करा तळणीचे मोदक

तरुण भारत लाईव्ह । १९ सप्टेंबर २०२३।  आज घरोघरी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. गणपतीला आवर्जून मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. मोदकाचे दोन प्रकार आपल्याला पहायला मिळतात एक म्हणजे उकडीचे मोदक आणि दुसरे म्हणजे गूळ खोबऱ्याचे मोदक. गूळ खोबऱ्याचे मोदक आपण अगदी १० मिनटात बनवू शकतो. गूळ खोबऱ्याचे मोदक घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
गव्हाचे पीठ, बारीक रवा, सुक्या खोबऱ्याचा कीस, तेल, खसखस, पिठीसाखर, वेलची पूड, बदाम, काजू, पिस्ता, बेदाणे, तेल

कृती
सर्वप्रथम गव्हाचे पीठ, रवा, आणि चवीपुरती मीठ घालून घट्ट कणीक भिजवून घ्यावी. हे पीठ भिजवत असताना तेल गरम करून त्याचे मोहन घालावे. यानंतर एका तव्यावर खोबर आणि खसखस परतवून घ्यावी. गॅस बंद केल्यावर त्यामधे सुकामेव्याची पूड आणि पिठीसाखर, घालून सगळे चांगले एकजीव करावे. नंतर मळून घेतलेल्या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्या. या पुऱ्यांमधे सारण भरून त्याला पाकळ्या करून मोदक बनवावा. नंतर एका कढईत तेल तापवून घ्यावे. आणि तेल गरम झाल्यावर छान खरपुर तळून घ्यावेत.