तरुण भारत लाईव्ह । १२ सप्टेंबर २०२३। हिंगोलीतून एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. हिंगोलीत जन्मदात्या बापाकडून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलगी गरोदर राहिली आणि हे प्रकरण समोर आले.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात जुमाडा गावात तिच्या बापाने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. यानंतर ती गरोदर राहिली. ती घटना जर कोणाला सांगितली तर मारून टाकेल अशी धमकी बापाने तिला आणि तिच्या आईला दिली. त्यामुळे या घटनेची कुठेही वाच्यता नव्हती. मात्र हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली आणि हे प्रकरण समोर आले.
प्रसूतीसाठी दाखल झालेल्या रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीने सांगितले कि लग्नानंतर दोन महिन्यांनी एका अपघातात माझ्या नवऱ्याचे निधन झाले. अशी माहिती दिली होती. परंतु रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आई आणि मुलीच्या हालचालींवर संशय येत होता. आणि लगेच हि माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये वडिलांनीच मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून बासंबा पोलिसांनी नराधम बापाच्या विरोधात पोकसो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.