उत्तराखंडमधील उधम सिंग नगर येथील नानकमत्ता गुरुद्वाराचे प्रमुख जथेदार बाबा तरसेम सिंग यांच्या हत्येतील मुख्य आरोपी मंगळवारी पोलीस चकमकीत ठार झाला. अमरजीत सिंग उर्फ बिट्टू असे आरोपीचे नाव आहे. तो आपल्या साथीदारासह पळून जाण्याचा बेत आखत सहारनपूरच्या दिशेने जात होता. भवानीपूर परिसरात विशेष तपास पथक (एसटीएफ) आणि हरिद्वार पोलिसांनी ही चकमक केली. त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.
बाबा तरसेमसिंग यांच्या हत्येतील मुख्य आरोपी चकमकीत ठार
Updated On: एप्रिल 29, 2024 11:01 am

---Advertisement---