जळगाव । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोन्याच्या किमतीने पुन्हा विक्रमी पातळी गाठली आहे. दसरा, दिवाळी सारखे मोठे सण आता काही दिवसांवर येऊन ठेपले असताना सोन्याचे दर गगनाला भिडल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा भाव विनाजीएसटी ७६ हजार रुपयावर गेला आहे. आज काय आहेत भाव जाणून घ्या..
जळगावच्या सराफ बाजरात काल गुरुवारी सोने दरात ५०० रुपयाची वाढ झाल्यामुळे आज शुक्रवार सकाळच्या सत्रात सोन्याचा दर विक्रमी ७६,६०० रुपये (विनाजीएसटी) प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर जीएसटीसह सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७८९०० रुपयावर पोहोचले आहे. मागील आठ दिवसात सोने दराने प्रति तोळा तब्बल २३०० रुपयांहून अधिकची भरारी घेतली.
सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे होत असलेली दर वाढ अशीच सुरूच राहिली तर दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ८० हजार रुपयाचा टप्पा गाठू शकतो. तसेच जळगावात मागील आठ दिवसात चांदी दरात ३००० हजाराहून अधिकची वाढ दिसून आली. सध्या चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ९२५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर जीएसटीसह चांदीचा दर ९५३०० रुपयापर्यंत गेला आहे.