बाबो..! जळगावात सोने चांदीने गाठला नवा उच्चांक, आताचे भाव वाचून चक्रावून जाल

जळगाव : मार्च आणि एप्रिल महिन्यात उच्चांक गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतीत मे महिन्याच्या सुरुवातीला काहीसा दिलासा मिळाला. परंतु गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा सोन्या आणि चांदीची झळाळी वाढली आहे. जळगाव सुवर्ण नगरीत सोमवारी चांदीच्या भावात एकाच दिवसात अडीच हजार रुपयांची वाढ झाली.

त्यामुळे चांदी आता ९० हजारांचा टप्पा ओलांडून ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोन्यानेही ७०० रुपयांच्या वाढीसह ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ते ७५ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. या दोन्हीही मौल्यवान धातूंचा हा नवा उच्चांक ठरला आहे

सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने तसेच चीननेही सोने खरेदी वाढवल्याने मार्च महिन्यापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. त्यापाठोपाठ चांदीचीही खरेदी वाढल्याने तिचेही भाव वाढू लागले होते, मात्र एप्रिलअखेरीस या भाववाढीला काही अंशी ब्रेक लागला होता, परंतु आता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे भाव पुन्हा एकदा नवनवीन उच्चांक गाठू लागले आहेत आणि यावेळी चांदी मोठी झेप घेत

१३ दिवसांतच चांदीत १० हजारांनी वाढ
चांदीच्या भाववाढीचा वेग पाहिला तर १३ दिवसांतच दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला चांदी ८१ हजार रुपये होती. एका सप्ताहात ती ८२ हजार ७०० रुपयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर १८ रोजी चांदीने ९० हजार रुपयांचा टप्पा गाठला आणि त्यानंतर सोमवारी तर अडीच हजारांची झेप घेत आता चांदीने एक लाखाकडे वाटचाल केली आहे. आताच्या भावानुसार एक किलो चांदीसाठी जीएसटीसह ९५ हजार २७५ रुपये मोजावे लागणार आहे.