जळगाव : साथीदारांसोबत बियरबारमध्ये मद्यप्राशन करताना गावठी कट्टयातून गोळीबार केला होता. या प्रकरणी २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह त्याच्या साथीदारांविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यामुळे महाविद्यालयीन तरुण कायद्याच्या कचाट्यात आला आहे.
मंगळवार, २७ रोजी संध्याकाळी ६.५४ वाजता शहरातील हॉटेल न्यु शालीमार हॉटेलमध्ये विद्यार्थी आणि त्याचे साथीदार टेबलावर मद्यप्राशन करत होते. अचानक या विद्यार्थ्याने गावठी कट्टा काढुन जमिनीवर गोळी झाडली. बाहेर जर कोणाला काही सांगितले तर जिवे मारेन, अशी धमकी त्याने दिली होती. या घटनेची गंभीर दखल घेत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोनि राकेश मानगावकर यांच्यासह एलसीबीच्या टीमने बारला भेट देत घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज घेऊन तपासाला गती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि अनिल मोरे हे करीत आहेत.
साथीदारांचा शोध सुरु
गोळीबार प्रकरणी इतर सार्थीदारांचा शोध घेतला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, त्याचा अनधिकृतरित्या वापर केला. हा गावठी कट्टा कोठुन घेतला होता? किंवा कोणी दिला होता. बारमध्ये कट्टा आणण्या मागचा उद्देश काय होता? या अनुषंगाने तपासावर पोलिसांनी भर दिला आहे. एकंदर गोळीबार प्रकरण विद्यार्थ्यासह त्याचे साथीदार कचाट्यात आले आहेत