कजगाव : बालपण, तरुणपण, आणि वृद्धपकाळ हे मनुष्याच्या जीवनातील तीन टप्पे असतात त्यामुळे तिन्ही टप्यात मनुष्य आप आपल्या पद्धतीने संघर्ष करून वृद्धपकाळ या शेवटच्या टप्यात येत असतो. त्यामुळे या काळात अनेकांच्या वाटेला आनंद तर अनेकांच्या वाटेला दुःख ही येते आणि तेच दुःख किंव्हा आनंद व्यक्त करण्यासाठी कुटुंबापलीकडे जिव्हाळ्याचा कोणीतरी पाहिजे हे वास्तव डोळ्यासमोर ठेवून आणि त्याच पद्धतीने कजगाव येथील काही जेष्ठ नागरीकांनी मिळून अमर संजीवनी नावाचा जेष्ठ नागरिक संघ तयार करून एक आगळा वेगळा आदर्श तरुणा सह वृध्दा समोर उभा केला कजगाव येथील जेष्ठ नागरिक असलेल्या जुन्या मित्रांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे ह्याच उद्देशाने हा संघ गेल्या वर्षी तयार केला वर्षपूर्ती निमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन दि.५ रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते अमर संजीवनी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा उद्योजक वसंतराव शिनकर,उपाध्यक्ष पंजाबराव देवकर,सचिव तथा सेवानिवृत्त शिक्षक बी.के.पाटील,जेष्ठ संचालक व कमलशांती पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रमोद ललवाणी,या जेष्ठ नागरिक असलेल्या मित्रांचा महत्वाचा वाटा आहे त्यांनी संघ पुढे घेऊन जाण्यासाठी मोठी अपार मेहनत घेऊन आजच्या घडीला जेष्ठ नागरिक संघात संचालक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक निंबा महाजन,मा शिक्षक पी. सी. पाटील,बी. जे. पाटील,एच जे. पाटील.डॉ वसंतराव भोसले,पत्रकार सुनील पाटील,डॉ. राजेंद्र पाटील,या अकरा संचालकांसह कजगाव,पिंप्री,खाजोळे, भोरटेक,तांदुळवाडी, व विविध गावातील तब्बल शंभर हुन अधिक सदस्य नोंदणी झाली आहे.
विशेष बाब म्हणजे हें जेष्ठ नागरिक कितीही वयोवृद्ध सदस्यांच्या घरी जाऊन मोठ्या आपुलकीने जन्मदिवस साजरा करून त्यांच्या बरोबर वेळ घालवत असतात आणि महिन्यातून किमान एक दिवस स्नेह भोजनाचा सामूहिक आनंद घेऊन तृप्त होतात सध्याच्या घडीला या जेष्ठ नागरिक संघाला कजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मोठा ओपनपेस भूखंड देण्यात आला आहे त्यावर वृक्ष लागवड व कंपाउंड करण्यात आले आहे व आगामी काळात त्यांनी सुशोभीकरणाच्या बाबतीत संकल्प केला आहे जेष्ठ नगरीकांना आता अमरसंजीवनी ने मोठी संजीवनी दिल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली मित्र गोतावळ्यात हरवलेले बालपण शोधून काढले या जेष्ठ नागरिकांमध्ये अनेक सदस्य हे पूर्वाश्रमीचे जुने बाल मित्र आहेत आपल्या जुन्या मित्रांसोबत अनेकांनी अजूनही वेळ घालवण्याचे ठरवले आहे त्यात अनेकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता दि.५ रोजी जेष्ठ नागरिक संघाचा प्रथम वर्धापन दिवस साजरा करण्यात आला यावेळी भोरटेकचे माजी सरपंच तथा कजगावच्या कमलशांती पतसंस्थेचे व्हा.चेअरमन गोविंदा महाजन व एम.एस.महाजन या बंधूनी स्नेह भोजनाचे व भेटी गटीगाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदरील कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून माजी तहसीलदार तथा एरंडोल सर्वोदय जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीधर माळी, होते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी माजी शिक्षण सभापती एकनाथ महाजन,एरंडोलचे अरुण माळी,माजी जि. प.सदस्य डॉ. उत्तमराव महाजन,डॉ. उत्तमराव पाटील, श्री. कुलकर्णी,शिवदास महाजन,व कजगाव अमर संजिवनी जेष्टनागरीक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव,संचालक,व सदस्य मोठ्या उपस्थित होते