धुळे : लग्नाचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी २२ रोजी मध्यरात्री एकाविरुद्ध थाळनेर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, तर शिंदखेडा तालुक्यातील एका गावात ४९ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध शिंदखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
शिरपूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून संशयित आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्य फिर्यादीवरून थाळनेर पोलिस स्टेशनला संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा विनयभंग
शिंदखेडा तालुक्यातील एक गावात ४९ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना १९ ऑक्टोबर रोज रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी रात्र १०:४५ वाजता शिंदखेडा पोलिस स्टेशनला तीन संशयितांविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक मिलिंद पवा करीत आहेत.