बिग बी बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीचा कथित वाद: 1.16 लाखांचे शेअर्स विकले

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध बच्चन कुटुंबात काही आलबेल नसल्याचा चर्चा सोशल मीडियापासून चित्रपटसृष्टीत रंगल्या आहेत. अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्यात तणाव असून ते लवकरच विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. असं म्हणतात की बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहे, अशी चर्चा रंगली आहे. अभिषेक, ऐश्वर्या राय आणि सर्व बच्चन कुटुंब नुकतच अगस्त्या नंदा यांच्या द आर्चीज चा प्रीमियर शोच्या वेळी एकत्र दिसलं होतं. यावेळी बच्चन कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांकडे सर्वांचं बारीक लक्ष होतं. या सोहळ्यात बच्चन कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये एक तणाव दिसून येतं होता. अशातच अमिताभ बच्चन यांनी मोठं पाऊल उचलं आहे. त्यांनी 1.16 लाखांचे शेअर्स विकले आहेत.

बिग बींचं मोठं पाऊल

अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच एका कंपनीचे 1.16 लाख शेअर्स विकल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. बॉलिवूड मेगा स्टार अमिताभ यांनी डीपी वायर्स लिमिटेडचे ​​1.16  लाख शेअर्स विकले. जर आपण कंपनीच्या नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्नवर एक नजर टाकली. तर असं दिसून येतं की, अमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या DP वायर्स लिमिटेडमध्ये 1.27 टक्क्यांचा हिस्सा आहे. या हिस्साचं बोलायचं झालं तर तो सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत 1.47 टक्के इतका होता.

अमिताभ बच्चन यांनी डीपी वायर्स लिमिटेडचे ​​शेअर्स का विकले, याबद्दल कोणालाही काही माहिती नाही. पण डीपी वायर्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असतानाही बिग बींनी शेअर्स का विकले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यानंतर, डीपी वायर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिल्याचं पाहिलं आहे. विशेष म्हणजे डीपी वायर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी मोठा नफाही कमावला आहे. तरदुसरीकडे अमिताभ यांनी डीपी वायर्सचे शेअर्स विकून इतर काही शेअर्समध्ये गुंतवणूक केली असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे.