तळोदा : शहरापासून हकेच्या अतंरावर असलेल्या धानकावाडा जवळील साईबाबा मंदीराजवळ मध्यरात्री २ वाजेदरम्यान शेतमळयातील गोठयात बाधलेल्या शेळी कळपावर बिबटयाने हल्ला केला. यात दोन शेळया ठार, तर एक शेळी जख्मी केली. ठार केलेल्या दोन शेळी पैकी एक शेळी बिबटयाने जबडयात उचलून ऊसाच्या शेतात नेली. या घटनेमुळे परिसरातील नागरीक व शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, बिबटयाला वनविभागाने जरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
शहरापासून हकेच्या अतंरावर असलेल्या धानकावाडा जवळील साईबाबा मंदीराजवळ राजेश सुर्यवंशी यांचा मळा आहे. दरम्यान, ३१ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेदरम्यान बिबट्याने गोठयाच्या कुङ फाडून आत प्रवेश करून तीन शेळीवर ह्ल्ला केला. यात दोन शेळया ठार, तर एक शेळी जख्मी केली. ठार केलेल्या दोन शेळी पैकी एक शेळी बिबटयाने जबडयात उचलून ऊसाच्या शेतात नेली.
शेळ्या आवाजामुळे रंग्या नमला धानक याला जाग आली. त्याने गोठयात जावून पहिले तर एक शेळी जख्मी तर एक शेळी ठार केली ती गोठयात पडलेली. दुसरी शेळी बिबटया जबडयात उचलून नेत असल्याचे प्रत्यक्ष बधीतले. भयभित अवस्थेत त्याने जवळ असलेल्या साईबाबा मंदीरात बसून राहीला. पहाटे ४ वाजे दरम्यान परत बिबटया दुसऱ्या ठार केलेल्या शेळी उचलण्यासाठी आला पंरतू रंग्या धानकाने जोर जोराने ओरडून बिबटया पळून लावले. सकाळी घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागच्या कर्मचा-यानी घटनाथळी भेट देवून पाहाणी केली. परिसरातील नागरीक व शेतकरी यांनी बिबटया बदोस्त कर०याची वनविभागाकडे केली.