बिहारनंतर ‘या’ राज्यामध्ये जातनिहाय सर्वेक्षण मंजूर

बिहारला डोळ्यासमोर ठेवून आता झारखंडच्या मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनीही जातीनिहाय सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली आहे. 18 फेब्रुवारी रोजी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कार्मिक विभागाला दिले आहेत. याआधी बिहार हे एकमेव राज्य होते जिथे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले होते. बिहारनंतर झारखंड हे देशातील दुसरे राज्य आहे, जेथे जातीवर आधारित सर्वेक्षण केले जाईल.