तरुण भारत लाईव्ह । १२ सप्टेंबर २०२३। कुणाला तिखट पदार्थ खायला आवडतात तर कोणाला गोड पदार्थ आवडतात. घरातही काहीतरी गोड पदार्थ असायलाच हवा म्हणजे जेव्हा भूक लागली असेल किंवा काहीतरी गोड खावंसं वाटत असलं तर लगेच उपलब्ध असायला हवं पण घरी काय गोड करून ठेवता येईल तर यावेळी तुम्ही बुंदिचे लाडू करू शकतात. बुंदीचे लाडू घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
बेसन, साखर, तूप, केशरी खायचा रंग, पाणी, मिरची, वेलची, केशर.
कृती
सर्वप्रथम, बेसन आणि केशरी रंग यामध्ये पाणी घालून घट्ट भिजवून घ्या. यानंतर एका कढईमधे तूप गरम करायला ठेवा. यामध्ये मंद आचेवर बुंदी तळायला ठेवा. नंतर बुंदी एका ताटात काढून ठेवा. यानंतर साखरीचा पाक तयार करायला घ्यावा. त्यामध्ये वेलची पूड, केसर, आणि बुंदी घाला आणि हे मिश्रण थंड झाल्यावर लाडू मळून घ्या. तयार आहे बुंदीचे लाडू.