तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा देण्यात आाल आहे. बुध ग्रहाच्या गोचरामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. बुध ग्रह १ ऑक्टोबरला स्वरास असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार असून यामुळे भद्र राजयोग तयार होणार आहे. या योगाचा फायदा काही राशींवर होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
वृषभ रास
या काळात या राशींच्या लोकांना भरपूर फायदा होणार आहे. उत्पनाचे नवे मार्ग सापडतील. घरात सकारात्मक वातावरण राहील. नोकरीच्या ठिकाणी आपले वर्चस्व राहील. मानसन्मान मिळेल.
मिथुन रास
या काळात या राशींच्या लोकांना करियरच्या दृष्टीने योग्य काळ आहे. व्यवसायात भरभराट होईल. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल. सुख शांती लाभेल.
वृश्चिक रास
या काळात या राशींच्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. संततीकडून शुभवार्ता समजतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.