मुंबई : बुलढाण्यात (buldhana) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) उपस्थित होते. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असल्याने त्याची जोरदार चर्चा सध्या होत आहे.
उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit pawar) हे शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यानं चर्चा सुरु झाल्या होत्या त्यावर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस लेह लडाखच्या दौऱ्यावर असल्यानं ते कार्यक्रमाला आले नसल्याचं सांगितलं. तर, अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्यानं ते देखील उपस्थित राहिले नसल्याचं महाजन म्हणाले.
दरम्यान शासन आपल्या दारी कार्यक्रमाला अजित पवार यांनी अचानक दांडी मारल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी कामाचा सपाटाच लावला होता. मात्र अजित दादांच्या सुसाट कार्यपद्धतीला मुख्य सचिवांच्या एका आदेशाने ब्रेक लागला. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून फाइल्स उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर पोहोचतील.