पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अंतर्गत भरती निघाली असून या भरतीबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या ६४ जागा भरल्या जाणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. १९ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या –
प्रादेशिक अधिकारी – ०२ जागा
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – ०१ जागा
वैज्ञानिक अधिकारी – ०२ जागा
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – ०४ जागा
प्रमुख लेखापाल – ०३ जागा
विधी सहायक – ०३ जागा
कनिष्ठ लघुलेखक – १४ जागा
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक – १६ जागा
वरिष्ठ लिपिक – १० जागा
प्रयोगशाळा सहायक – ०३ जागा
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक – ०६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ६४ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात पदवीधर/ पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. पदनिहाय विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]
वेतनश्रेणी –
प्रादेशिक अधिकारी – ६७ हजार ७०० ते २ लाख ८ हजार ७००
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – ६७ हजार ७०० ते २ लाख ८ हजार ७००
वैज्ञानिक अधिकारी – ५५ हजार १०० १ लाख ७५ हजार १००
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – ४१ हजार ८०० ते १ लाख ३२ हजार ३००
प्रमुख लेखापाल – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
विधी सहायक – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
कनिष्ठ लघुलेखक – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४००
वरिष्ठ लिपिक – २५ हजार ५०० ते ८१ हजार १००
प्रयोगशाळा सहायक – २१ हजार ७०० ते ६९ हजार १००
कनिष्ठ लिपिक/टंक लेखक – १९ हजार ९०० ते ६३ हजार २००