बैठक सुरु होताच मल्लिकार्जुन खरगेंच मोठं विधान; सर्वांच्याच उंचावल्या भुवया, काय म्हणाले?

Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीला देशभरातील 28 पक्षांचे प्रमुख आणि काही राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर झाल्या आहेत. इंडिया आघाडीच्या या तिसऱ्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, ही बैठक सुरु होताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वच नेत्यांना उद्देशून तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असं म्हटलं आहे. आपण एकत्र आलो आहोत. त्यामुळे आपल्यामागे कोणतेही बालंट लावलं जाईल. आपल्याला त्रास देऊन तुरुंगात टाकलं जाईल. आपली शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे डगमगू नका. तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.