ब्रिटन, फ्रान्स, रशियाला मागे टाकत भारताचा जीडीपी ३.७५ ट्रिलियन डॉलर

नवी दिल्ली : अमेरिका, युरोपसह अनेक देश मंदीच्या लाटेचा सामना करत असत असतांना भारतीय अर्थव्यवस्थेने २०२३ मध्ये मोठा विक्रम केला आहे. देशाच्या जीडीपी ने ३.७५ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थ खात्याने ट्विट करुन माहिती दिली. २०१४ नंतर पहिल्यांदाच भारताचा जीडीपी दोन ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त वाढून २०२३ मध्ये ३.७५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली. सध्याच्या किंमतीनुसार भारताचा जीडीपी ब्रिटन ३,१५९ अरब डॉलर, फ्रान्स २,९२४ अरब डॉलर, कॅनडा २,०८९ अरब डॉलर, रशिया १,८४० अरब डॉलर आणि ऑस्ट्रलिया १,५५० अरब डॉलर पेक्षा जास्त आहे.

अर्थ मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, भारताचा जीडीपी २०२३ मध्ये ३.७५ ट्रिलियनवर पोहोचला आहे, जो २०१४ मध्ये सुमारे २ ट्रिलियन डॉलर होती. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चमकणारी मानली जाते. सध्याच्या किंमतीनुसार भारताचा जीडीपी ३,७३७ अब्ज डॉलर आहे. विकसित देशांशी तुलना केल्यास, भारताचा जीडीपी अमेरिका ( २६,८५४ अरब डॉलर), चीन (१९,३७४ अरब डॉलर), जपान (४,४१० अरब डॉलर) आणि जर्मनी (४,३०९ अरब डॉलर) च्या जीडीपीपेक्षा कमी आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज दरम्यान, रेटिंग एजन्सी मूडीजने रविवारी जूनच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ६ टक्के ते ६.३ टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने वर्तवलेल्या ८ टक्के विकास दरापेक्षा खूपच कमी असल्याचा मूडीजचा अंदाज आहे.