Crime News : प्रेमात असलेली व्यक्ती केव्हा काय करेल याचा नेम नाही. प्रेमप्रकरणातून सोशल मीडियावर अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु आता एक बातमी समोर आली आहे ती धक्कादायकच. दोन प्रेमी युगूलांमधील भांडणामुळे प्रेयसीचा जीव गेला आहे.
अमरावतीमधील ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून तरुण आणि तरुणी एकमेकांवर प्रेम करत होते. ते दोघेही अमरावतीच्या राम मेघे कॉलेजचे विद्यार्थी असून ITI ला शिकत होते. कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्यात मैत्री झाली. पुढे ही मैत्री प्रेमात बदलली.
काही दिवसांनी दोघांमधील वाद वाढू लागले. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेताला. ब्रेकअप करताना तू मला शेवटची एकदा तरी भेट असा हट्ट प्रियकराने प्रेयसीकडे केला. पाणावलेल्या डोळ्यांनी दोघेही एकमेकांना भेटले. मात्र काही वेळातच चित्र बदललं. तरुणाने आपला खरा रंग दाखवला.
त्याने धारधार शस्त्राने प्रेयसीवर वार केले. यात ती खाली कोसळली. तिच्या मानेवार वार केल्याने या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला.यानंतर तरुणाने आपल्या हातावर देखील चाकूने वार केला आणि तोही तरुणीच्या शेजारी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या दुर्दैवी घटनेत तरुणीला आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.