भुसावळ : दौड-मनमाड सेक्शनमध्ये कोपरगाव-कान्हेगाव या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वेच्या दुसर्या रेल्वे लाईनीचे काम सुरू करण्यात आल्याने 20 ते 25 जानेवारी या काळात ब्लॉक घेण्यात आल्याने 10 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 13 रेल्वे गाड्याचे मार्ग बदल करण्यात आले आहे. रेल्वेच्या दुहेरी लाईनीच्या कामासाठी प्रशासनाकडून ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. 20 ते 25 जानेवारी 2023 या काळात हा ब्लॉक कोपरगाव ते कान्हेगाव या दरम्यान राहणार आहे. याचा परीणाम रेल्वे गाड्यावर होणार आहे.
या रेल्वेगाड्या झाल्या रद्द
दादर-साई नगर शिर्डी 20 ते 27 जानेवारी या काळात रद्द करण्यात आली आहे तर साई नगर शिर्डी-दादर ही शिर्डीवरून सुटणारी गाडी 21 ते 28 या काळात रद्द करण्यात आली. दादर साई नगर शिर्डी ही गाडी दादर येथून 25 ते 28 जानेवारी या काळात रद्द आहे तर साईनगर शिर्डी-दादर (12132) ही साईनगर येथून सुटणारी गाडी 26 ते 29 जानेवारी या काळात रद्द करण्यात आली आहे. दौंड-निजामाबाद मेमू ही दौंड येथून निघणारी गाडी 20 ते 28 जानेवारी या काळात रद्द असेल तर लिंक गाड्यांमध्ये निजामाबाद पंढरपूर निजामाबाद रेक लावून ही गाडी सोलापूर-दौड-पुणे व्हाया कुर्डूवाडी-पंढरपूरमार्गे धावणार आहे. निजामाबाद पुणे मेमू गाडी जी निजामाबाद येथून निघणारी गाडी 22 ते 30 जानेवारी दरम्यान रद्द असेल तर भुसावळ-दौंड मेमू गाडी जी भुसावळ येथून निघणारी 19 आणि 26 जोनवारी काळात रद्द करण्यात आली. दौंड-भुसवळ मेमू गाडी जी दौडं येथून सुटणारी 19 ते 26 जानेवारी या काळात रद्द असेल. कोल्हापूर-गोंदिया ही गाडी 26 व 27 जानेवारीला रद्द करण्यात आली असून गोंदिया-कोल्हापूर ही गोंदिया येथून सुटणारी गाडी 28 व 29 जानेवारीला रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांचा मार्गात झाला बदल
हजरत-निजामुद्दीन यशवंतपूर ही गाडी हजरत निजामुद्दीन येथून निघणारी गाडी 27 जानेवारी रोजी संत हिरदाराम नगर मक्सी जंक्शन-नागदा, रतलाम, वडोदरा, वसईरोड, पनवेल, कर्जत, लोनावळा, पुणेमार्गे वळविण्यात आली तर हावडा-पुणे ही गाडी 26 जानेवारीला नागपूर, बल्लारशहा, काजिपेठ, सिकंदराबाद, द वाडी, डुंड, पुणे मार्गे वळविण्यात येणार आहे. सिकंदराबाद साईनगर शिर्डी ही गाडी सिकंदराबाद येथून सुटणारी गाडी 27 जानेवारीला सिकंदराबाद, वाडी, दौड, पुणतांबे, साईनगर शिर्डी मार्गे वळवण्यात येईल तर हजरत निजामुद्दिन वास्को ही गाडी हजरत निजामुद्दिन येथून 27 जानेवारीला सुटणारी गाडी संत हिरदाराम नगर, मक्सी जंक्शन, नागदा, रतलाम, वडोदरा, वसईरोड, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणेमार्गे वळवण्यात आली आहे. नवी दिल्ली-बंगळूरू ही गाडी दिल्ली येथून 27 जानेवारीला सुटणारी गाडी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, पुणे, दौड मार्गे धावणार आहे. हटिया पुणे ही गाडी 27 जानेवारीला हटिया येथून सुटणारी गाडी नागपूर, बल्लारशा, काजीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौड, पुणे मार्गे वळविली आहे. दानापूर पुणे ही गाडी दानापूर येथून 27 जानेवारीला मनमाड, ईगतपुरी, कल्याण, पनवेल, पुणे मार्गे धावणार आहे. वास्को- हजरत निजामुद्दिन ही गाडी वास्को येथून 27 जानेवारीला सुटेल. ही गाडी पुणे, लोणावळा, कर्जत, वसईरोड,वडोदरा, रतलाम, नागदा, मक्सी जंक्शन, संत हिरदाराम नगरमार्गे वळविली आहे. हुबळी-हजरत निजामुद्दिन ही गाडी हुबळी येथून 27 जानेवारीला पुणे-लोनावळा, पनवेल, कल्याण, ईगतपुपरी, मनमाड मार्गे धावणार आहे. बंगलुरू नइ दिल्ली जी गाडी बंगलुरू येतून 27जोनवारीला निघून ही गाडी पुणे, लोणावळा, कर्जत, वासी रोड, वडोदरा, रतलाम, नागदा, मक्सी जंक्शन, संत हिरदाराम नगर मार्गे वळविली आहे. पुणे गोरखपूर ही गाडी 28 जानेवारीला पुण्यातून सुटणारी गाडी पुणे, लोनावळा, पनवेल, कल्याण, ईगतपुरी, मनमाड मार्गे वळविली आहे. साई नगर शिर्डी – सिकंदराबाद ही गाडी 28 जानेवारीला शिर्डी, पुणतांबा, दौड, वाडी, सिकंदराबाद मार्गे वळविली आहे. पुणे हावडा ही गाडी 28 जानेवारीला पुणे, लोनावळा, पनवेल, कल्याण, ईगतपुरी, मनमाडेमार्गे धावणार आहे.