जळगाव : जिल्हयातील भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली असून. नविन कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे भडगाव, पाचोरा, पारोळा व अमळनेर तालुक्यात राहणार असून आरटीओ कोड MH-54 असा असणार आहे. कार्यालय कार्यान्वीत झाल्यानंतर पहिल्या टप्या, 21 मार्च पासून सर्व नविन वाहनांची नोंदणी भडगाव येथील नविन कार्यालयाव्दारे करण्यात येणार आहे.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील हलके / अवजड मालवाहू वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, हलके मोटार वाहन (परिवहनेतर) खाजगी कार / ट्रॅक्टर-टगेलर/कस्ट्रक्शंन इक्युपमेंट व्हेईकल) वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54B.0001 ते 9999 व तीनचाकी परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54C.0001 ते 9999 पर्यंतची मालिका 22 मार्च, 2024 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी शासकीय शुल्काचा Dy RTO Bhadgaon यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. असे आवाहन जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
तसेच नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे गट नं. 84/2/ब/1/ब, मौजे टोणगाव, भडगाव-पाचोरा रोड, आिार्वाद जिनिंग समोर, भडगाव – 424105 ता. भडगाव येथे असून भडगाव, पाचोरा, पारोळी व अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे आरटीओ संबधित कामकाज हे भडगाव येथेच करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोहि यांनी केले आहे.