---Advertisement---
जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढताना दिसत आहे. अशातच भडगाव पोलीस स्टेशनच्या हवालदाराला तडजोडीअंती ५० हजारांची लाच स्वीकारतांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी रंगेहात अटक केली. किरण रविंद्र पाटील (वय 41) असे लाचखोर हवालदाराने नाव असून या करवाईने जिल्हा पॅलेस दलात मोठी खळबळ उडाली.
याबाबत असं की, भडगाव शहरातील 28 वर्षीय तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्यावर यापूर्वी भडगाव पोलिसात अवैध वाळू वाहतूकी संदर्भात दोन गुन्हे दाखल आहे. तक्रारदार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 रोजी आरोपी हवालदाराने दोन लाख 60 हजारांची लाच मागितली होती.
या बाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. लाचेतील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष 50 हजार रुपये घेताना हवालदार किरण पाटील यास आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
---Advertisement---