अनैतिक संबंधांमुळे संतापलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. पत्नीचे पतीच्या पाठीमागे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधातून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. या भांडणात संतापलेल्या पतीने घरातच पत्नीचे शीर शरीरापासून वेगळे केले. त्यानंतर बायकोचे छिन्नविछिन्न शीर घेऊन रस्त्यावर निघाला. हे भयावह दृष्य पाहून लोकांचा थरकाप उडाला. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात ही घटना घडलीय. मिळलेल्या माहितीनुसार, बसरा गावातील अनिल नावाच्या तरुणाचा 8 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच त्याच्या पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. या अनैतिक संबंधावरून अनिल आणि त्याच्या पत्नीमध्ये शुक्रवारी वाद झाला. पती-पत्नीमधील भांडण इतके वाढले की, संतापलेल्या पतीने घरात ठेवलेल्या काठीने तिचा शिरच्छेद केला.
पत्नीची हत्या केल्यानंतर वेडा पती एका हातात बंका आणि दुसऱ्या हातात पत्नीचे छिन्नविछिन्न शीर घेऊन कोतवाली पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाला. रस्त्यावरील हे भयावह दृष्य पाहून लोकांचा थरकाप उडाला. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक लोकांनी फतेहपूर कोतवाली पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून विक्षिप्त पतीला अटक केली. पोलिसांनीही या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अनैतिक संबंधामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातून आरोपी अनिलने शुक्रवारी पत्नीची निर्घृण हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.