भयंकर ! राक्षस पतीने भरदिवसा पत्नीला संपवलं, काय आहे कारण ?

पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केली. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पूजा अरुण दाभाडे असे मयत विवाहितेचे नाव आहे.  कोपरगाव (जि.अहमदनग)  तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात आज सोमवारी दुपारी ही घटना  घडली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केलीय.

पोलीस सूत्रानुसार, अहमदनग जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात पूजा ही पतीसह वास्तव्यास होती. आज दुपारच्या सुमारास या दोघांमध्ये काही वाद झाल्यानंतर पतीने पूजाच्या डोक्यात हातोडा मारला. यात पूजाचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या विवाहित तरुणीची हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान संशयित आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.