तरुण भारत लाईव्ह । ८ सप्टेंबर २०२३। छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. हि घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा इथल्या बसस्थानकावर सकाळी नऊ वाजता घडली. मुक्तार रज्जाक शेख (44 रा. खंडाळा)असे मयताचे नाव आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक – छत्रपती संभाजीनगर बस ही संभाजीनगरकडे वेगात जात असताना तालुक्यातील खंडाळा येथील सर्कलमधून मुक्तार शेख यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी बसचा वेग इतका जास्त होता कि बस सोबत दुचाकी ३० फुटांपर्यंत फरपटत गेली. मुक्तार यांच्या डोक्याला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर त्यांना उपचा्रासाठी वैजापूर येथे दवाखान्यात हलविण्यात आले. पण रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चालकाला मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहे.