---Advertisement---

भरदिवसा स्वच्छता कर्मचाऱ्यावर गोळीबार, थोडक्यात वाचला जीव

---Advertisement---

औरंगाबाद : शहरात गोळीबाराची घटना घडली असून, एका स्वच्छता कर्मचाऱ्यावर हा गोळीबार करण्यात आला आहे. मात्र, सुदैवाने यात कोणेही जखमी झालेला नाही. ऐनवेळी मान बाजूला केल्याने हा स्वच्छता कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. प्रभाकर अहिरे असे गोळीबार करण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारे प्रभाकर अहिरे यांच्यावर घरात घूसुन गोळीबार करण्यात आला आहे. दोन तरुणांनी भरदिवसा घरात घुसून हा गोळीबार केला आहे. मात्र, अहिरे यांनी गोळीबार झाल्यावर मान खाली करून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोळी भिंतीला जाऊन लागली. तर, गोळीबार करून दोन्हीही तरुण तेथून पळून गेले.

विशेष म्हणजे गोळीबार करणारे हे दोन्ही तरुण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---