भरधाव कार झाडावर आदळली; ५ जणांचा मृत्यू, तीन जण जखमी

तरुण भारत लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२३। मध्यप्रदेशातून एक अपघाताची बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेशच्या शहडोलच्या सीमेला लागून असलेल्या उमरिया जिल्ह्यातील पाली रोडवर रविवारी भरधाव कार झाडावर आदळली, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत .

सूत्रानुसार, वाढदिवसाची पार्टी करुन सर्वजण मदारी ढाब्यावरून शहडोलकडे परतत होते. यावेळी उमरिया जिल्ह्यातील पाली पोलिस स्टेशन अंतर्गत घुंघुटी चौकीच्या माझगवान गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडावर आदळली. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जणांचा जिल्हा रुग्णालयात पोहोचताना मृत्यू झाला.

रविवारी रात्री २४, सप्टेंबर ला हा अपघात  झाला. या अपघातात मृत्यू झालेले पाच जण शहडोल येथील रहिवासी आहेत. ही घटना इतकी भीषण होती की, वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.