भाजपची मोठी खेळी ; राहुल नार्वेकरांना लोकसभा निवडणूक लढण्याचे आदेश?

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगकडून तयारी केली जात असून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपाने कंबर कसली आहे. याच दरम्यान, एक मोठी खेळी केली आहे. दक्षिण मुंबईवर भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेक यांना थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरवण्याची तयारी भाजपने असून तसे त्याना निवडणूक लढण्याचे आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातचे शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सध्या इथले खासदार आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याचं समोर येत आहे. त्यानुसार या भागात निवडणुकीसाठी राहुल नार्वेकरांना  उतरवण्यास भाजप सज्ज झालं आहे. त्या अनुषंगाने नार्वेकर यांनी अनेक कार्यक्रमासही सुरूवात केली आहे. दक्षिण मुंबईचा हा मतदारसंघ घेण्यासाठी भाजपतर्फेही विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.