भाजपने केली लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; PM मोदी येथून लढणार

नवी दिल्ली । भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 34 केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्यामुळे मोठा सस्पेन्स आता वाढला आहे. यामुळे आता महाराष्ट्रातून कोणत्या उमेदावारांची नावे जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 16 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशातील 145 जागांचा निर्णय झाला आहे. 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचे नावे या यादीत आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांचं नाव आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे. या यादीत एकूण २८ महिला उमेदवारांची नावे आहेत. तर ५० वर्षांखालील ४७ उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपने पहिल्या यादीत ५७ ओबीसी, २७ एससी आणि १८ एसटी उमेदवारांना तिकीट दिले आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी वाराणसी आणि अमित शाह हे गांधीनगर येथून निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराची भाजपने घोषणा केली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत असल्यामुळे जागावाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही उमेदवाराचं नाव दिसलं नाही. महाराष्ट्रात असलेल्या 48 जागांमध्ये भाजप किती जागांवर लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याधीच सांगितलं आहे की शिवसेनेचे उमेदवार हे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावरच लढणार आहेत.

पहिल्या यादीत कोणत्या राज्यात किती जागा?
उत्तर प्रदेश 55, प. बंगाल 26, मध्यप्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 14 पैकी 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू-काश्मीर 2, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1, दिव-दमन 1, अशा 195 जागांची घोषणा भाजपने केली आहे.