भाजपने जाहीर केली उमेदवारांची दहावी यादी

भारतीय जनता पार्टीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आज दहावी यादी जाहीर केली. या यादीत एकूण नऊ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या उमेदवारांमध्ये सर्वाधिक सात उमेदवार यूपीमधून जाहीर करण्यात आले आहेत. यादीनुसार, मैनपुरीमधून जयवीर सिंग, बलियामधून नीरज शेखर, मछली शहरातून बीपी सरोज, गाझीपूरमधून पारस नाथ राय, कौशांबीमधून विनोद सोनकर, फुलपूरमधून प्रवीण पटेल आणि अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गाझीपूर येथील पारस नाथ राय हे संघाशी संबंधित आहेत. त्यांनी कधीही निवडणूक लढवली नसली तरी ते मनोज सिन्हा यांच्या जवळचे मानले जातात. त्यांचा मुलगा आशुतोष राय भारतीय जनता युवा मोर्चाचा यूपी अध्यक्ष आहे. फुलपूरमधून भाजपचे आमदार प्रवीण पटेल यांना तिकीट मिळाले आहे, ते बसपचे आमदारही राहिले आहेत.