भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. ‘लालाजी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या शर्मा यांनी १९९५ पासून सहा वेळा अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्य केले. बऱ्याच दिवसांपासून ते कैन्सरशी झुंज देत होते.
त्यांच्या मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भावनिक प्रतिक्रिया देत श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ‘आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली व्यक्त करतो. त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ सहकारी आणि एक पक्षनिष्ठ , ध्येयवादी नेता गमावला आहे.
पक्षाची ही अपरिमित हानी आहे.’, अशी भावनिक पोस्ट त्यांनी ट्विटवर पोस्ट केली. दरम्यान दि.४ नोव्हेबर रोजी दुपारी २ वाजता शर्मा यांची अत्ययात्रा काढली. त्याला देखील फडणवीसांनी उपस्थिती लावली आणि एक सच्चा रामभक्त, स्वयंसेवक आणि विदर्भवादी नेता हरपल्याचे सांगितले.