भाजपा एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, ही आहेत पाच कारणे…

मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, भाजपा एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, असे भाजपातील वरिष्ठांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना दुखवणार नाही, याची पाच कारणे आहेत.

१) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केल्यास भाजपची विश्वासर्हता धोक्यात येऊ शकते. भाजपने शिंदे गटाला डच्चू दिल्यास आगामी काळात कोणताही प्रादेशिक पक्ष भाजपसोबत येताना नक्की विचार करेल.

२) राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये आता सहभागी झाली असली तरी सरकार स्थापनेत त्यांचं कोणतंही योगदान नाही. तर मोठं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीशिवाय खातेवाटप अंतिम होऊ शकत नाही.

३) मुंबई महापालिकेच्या निवडणूका. नड्डा यांनी दिलेला मुंबई १५० हा आमचा नारा कायम आहे. मुंबई जिंकणार आणि चांगल्या पद्धतीने जिंकणार महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेच्या सोबत लढणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

४) आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीकोनातून भाजप शिंदे गटाला डच्चू देऊ शकत नाही. तर आगामी निवडणुकीत जास्त जागा जिंकण्याचे लक्ष भाजपने ठरवले आहे.

५) राज्यातील विरोध करणारे पक्ष आपल्या बाजूने वळवण्यासाठीचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत, यामुळे शिंदे गटाला भाजप सोडू शकत नाही.