ठाणे । कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला असून यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे अख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली असून आता या गोळीबार प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. आता एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे.
यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने लागलीच तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील तिघं आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांना दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.