भाजी विक्रेत्यांची तहान भागवण्यासाठी वडीलांच्या स्मरणार्थ सूरू केली पाणपोई

जळगाव :  बळीराम मंदिरासमोरील भाजीबाजार हा नेहेमीच चर्चेचा विषय दिवसभर उन्हात बसून गुजराण करणा—या भाजी विक्रेता बांधवासाठी अजय व विजय पिंगळै या भाजीविक्रेता बंधूनी स्व. सुभाषराव सुखदेवराव पिंगळे वडीलांच्या स्मरणार्थ पाणपोई सूरू केली आहे.

दरोरोज किमान १० जार पाण्याचे वाटप या पाणपोईतून केले जात आहे. विशेष म्हणजे जवळूनच हे जार मागवले जात असल्याने थंडगार पाणी उपलब्ध होत आहे. या भागात जवळपास ५० ते १०० विक्रेते दिवसभर उन्हातान्हात बसून भाजी विक्री करत असल्याने चढत्या तापमानात ही पाणपोई तहान भागवत असल्याने दिलासा मिळाला आहे. पिंगळे बंधूच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

स्वता दिवसभर बाजारात बसून कुटुंबांची गूजराण करणा—या पिंगळे कुटुंबाने कर्त्या माणसाची आठवण जपतांना आपल्या कमाईतील एक हिस्सा या पुण्यकामासाठी उपयोगात आणत नवीन आदर्श निर्माण केला आहे.